मुख्य बातमी
जिल्हा कोषागार कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

रत्नागिरी : जिल्हा जिल्हा कोषागार कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली. जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिरादार यांनी महात्मा फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी आस्थापना पर्यवेक्षक मीनाक्षी होरंबे, पर्यवेक्षक स्नेहल जाधव, कनिष्ठ लिपिक अनिकेत शिंदे, जयेश कुलकर्णी आणि कंत्राटी कर्मचारी करण पवार उपस्थित होते.



