मुख्य बातमी

रत्नागिरीत हिंदु युवतींसाठी शौर्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

रत्नागिरी : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु युवतींसाठी विशेष ‘शौर्य प्रशिक्षण शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. स्वसंरक्षणाचे महत्त्व लक्षात घेता, युवतींमध्ये आत्मविश्वास, धैर्य व युद्धकौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने हे शिबिर राबविण्यात येत आहे.

हे शिबिर १० ते २० मे दरम्यान दररोज सायंकाळी ४:३० ते ६ या वेळेत रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, मारुती मंदिर येथे होणार आहे. विशेष म्हणजे, या शिबिरासाठी प्रवेश पूर्णतः विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

शिबिरामध्ये सहभागी युवतींना लाठी-काठी युद्धकला, दंडसाखळी तंत्र आणि मार्शल आर्ट्स यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे युवतींना स्वतःचे संरक्षण करण्याबरोबरच मानसिक व शारीरिक सक्षमता वाढविण्यास मदत होणार आहे.

आयोजकांच्या मते, “आजच्या काळात स्वसंरक्षण ही अत्यावश्यक गरज बनली आहे. त्यामुळे प्रत्येक युवतीने ‘रणरागिणी’ बनून अन्यायाविरुद्ध उभे राहणे आवश्यक आहे.”

शिबिरासाठी मर्यादित जागा उपलब्ध असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!