महाराष्ट्रमुख्य बातमी

राज्यातील बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

मुंबई : राज्यातील बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या (२ मे) सकाळी ११ वाजता महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर, विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता ऑनलाईन वेबसाटईवर पाहाता येणार आहे. काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर, राज्यातील बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षेचा निकाल २ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपला आसन क्रमांक व इतर आवश्यक तपशीलांच्या आधारे निकाल पाहता येईल. यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी २ मे रोजी सकाळी ११ वाजता राज्य मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!