बारावी परीक्षा निकालानंतर समुपदेशन सेवा

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल २ मे रोजी जाहीर झाला. निकालानंतर राज्य मंडळ स्तरावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरू ठेवण्यात येत आहे.
समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक असे आहेत :
९९६०६४४४११, ७९७२५७३७४२, ९८३४०८४५९३, ९३५९९७८३१५, ८१६९२०२२१४, ९३७१६६१२५५, ७२०८४२९३८१, ७७०९१५६०६८, ८४२११५०५२८, ९४०४७८३९९६.
हे भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून आठ दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे नि:शुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील, अशी मागणी कोकण विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी दिली आहे.



