मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

लांजा येथे ट्रक उलटून चालकाचा जागीच मृत्यू

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील धनावडे शेती फार्मसमोर सोमवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने सुरक्षा भिंतीला आणि दिशादर्शक फलकाला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर ट्रक महामार्गावरच पलटी झाला, ज्यामध्ये ट्रकचा चालक केबिनखाली चिरडला जाऊन त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी : जितेश रामजी मसालिया (वय ३२ वर्ष, रा. शेख, टिंबो कोली वास, ता. अंजार, जि. कच्छ, गुजरात).सोमवारी दुपारी साधारण १२:४५ वाजता आपल्या ताब्यातील मालवाहू ट्रक (जीजे. १२ बी.झेड. २९१७) घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. धनावडे शेती फार्मजवळ रस्ता सरळ आणि वळणाचा असतानाही, चालकाने वेगावर नियंत्रण न ठेवल्याने ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा भिंतीला आणि फलकाला धडकला. धडक इतकी भीषण होती की ट्रक उलटला आणि चालक केबिनमध्ये अडकला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणी मृत ट्रक चालक जितेश मसालिया याच्या विरोधात निष्काळ जीपणे गाडी चालवल्याबद्दल भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५ (अ) व (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैंदाड  अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!