मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आंबा घाटात एसटी-एर्टिका कारची धडक; ५ जण जखमी

साखरपा : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात दख्खन बस थांब्याजवळ गुरुवारी सकाळी एसटी बस आणि एर्टिका कार यांच्यात भीषण समोरासमोर धडक होऊन पाचजण जखमी झाले. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद भिकाजी शिंदे (वय ५०, रा. भडकंबा) हे आपल्या ताब्यातील एसटी बस (एमएच १४ बीटी २७५३) खडीकोळवण ते साखरपा मार्गावर घेऊन जात होते. सकाळी सुमारे ९.४० वाजण्याच्या सुमारास बस आंबा घाटातील दख्खन बस थांब्याजवळ पोहोचली असता समोरून येणारी एर्टिका कार (एमएच ११ डीझेड ०३२९) आणि एसटी बस यांच्यात जोरदार धडक झाली.

एर्टिका चालक संतोष शिवाजी पवार (वय ५०, रा. रामनगर, सातारा) हे रत्नागिरीहून साताऱ्याकडे जात होते. या भीषण अपघातात एसटी चालक प्रल्हाद शिंदे, एसटी प्रवासी संजय तुकाराम शितप (वय ५८, रा. खडीकोळवण), एर्टिका चालक संतोष पवार, शंभुराज शिवाजी पवार (वय १३, रा. रामनगर, सातारा) तसेच श्रीकांत लक्ष्मण मानपुरी (वय २७, रा. भिवंडी, ठाणे) हे जखमी झाले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश सुतार, महिला हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर, कॉन्स्टेबल तानाजी पाटील आणि महिला कॉन्स्टेबल रेश्मा चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही सुरू केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!