मुख्य बातमीशैक्षणिक

पटवर्धन हायस्कूलमध्ये सायबर जागरूकता मोहीम 

रत्नागिरी : शहरातील पटवर्धन हायस्कूल येथे २३ ते २६ जुलै या कालावधीत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या सायबर वॉरियर क्लबतर्फे, आणि (Quick Heal) क्विक हिल फाउंडेशनच्या सहकार्याने “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” ही सायबर सुरक्षेबाबत जागरूकता वाढवणारी मोहीम राबवण्यात आली.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांबद्दल माहिती देणे आणि त्यांना डिजिटल जागरूक नागरिक बनवणे हा होता. कार्यक्रमात OTP (ओटीपी) फसवणूक, गेमिंग फ्रॉड, सोशल मीडिया फसवणूक यासारख्या सायबर गुन्ह्यांवर आधारित माहितीपूर्ण सादरीकरण, संवाद सत्र आणि प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले.

कार्यक्रमात (Cyber Warrior Club ) सायबर वॉरियर क्लब चे सदस्य रिद्धी जाधव, अथर्व सावंत, आर्या रिसबूड, वरद सरदेसाई, पार्वती रावळ, संस्कृती जाधव यांनी सायबर गुन्हे टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सावधगिरीच्या उपायांची माहिती प्रभावीपणे दिली. त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना रोजच्या डिजिटल व्यवहारात कोणती काळजी घ्यावी याचे समजून सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा शपथ घेतली आणि डिजिटल माध्यमात जबाबदारीने वागण्याची प्रतिज्ञा केली.

विद्यार्थ्यांना सायबर जागरूकतेचे शिक्षण मिळणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे पटवर्धन हायस्कूलमधील शिक्षक व प्रमुखांनी कार्यक्रमाचे कौतुक करताना सांगितले.

पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती जानकी घाटविलकर यांनी बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये आवश्यक उपक्रम म्हणून उल्लेख केला ही मोहीम क्विक हिल फाउंडेशनच्या सहकार्याने राबवण्यात आली असून, सायबर सुरक्षित भारत घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!