मुख्य बातमी

आचारसंहितेमुळे जून महिन्याचा लोकशाही दिन रद्द

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू असल्याने जून महिन्याचा १ जून रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नसल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.

जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. जून महिन्याचा लोकशाही दिन १ जून रोजी दुपारी १ ते २ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभागृहात होणार होता. तथापि, महाराष्ट्र विधान परिषद रायगड तथा रत्नागिरी तथा सिंधुदुर्ग स्थानिक मतदार संघाकरिता निवडणूक कार्यक्रम १८ मे पासून घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच १८ मे पासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच २५ जूनपर्यंत जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू असल्याने जून २०२६ महिन्याचा १ जून रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!