मुख्य बातमीराजकारण

रत्नागिरी शहर जेलनाका येथे अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक व्हावे

भारतीय जनता पार्टीने केली मागणी

रत्नागिरी : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती विविध कार्यक्रमाने साजरी केली जाणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्य अनेक शतकानंतर देखील सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांनी सर्वच क्षेत्रात केलेले काम या सर्वांचा आजही आदर्श घेण्यासारखा आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक रत्नागिरी शहरांमध्ये व्हावे अशी प्रमुख मागणी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

सध्या रत्नागिरी शहरांमध्ये जेलनाका चौक या ठिकाणी तुळशी वृंदावन लावून सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे. याच ठिकाणी संघर्षमय जीवन जगत जगासमोर आदर्श ठेवणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक व्हावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आली. निवासी जिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी, मुख्याधिकारी वैभव गारवे यांना भेटून निवेदन देत ही मागणी करण्यात आली.

या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक झाल्यास ते सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरणार आहे. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नीलेश आखाडे, शहराध्यक्ष दादा ढेकणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर, मंदार खंडकर, गुरुप्रसाद फाटक दीपक आपटे, भटके विमुक्त आघाडीचे पदाधिकारी, भाजपाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!