मुख्य बातमी

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पटवर्धन हायस्कूलमध्ये वृक्षारोपण

रत्नागिरी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी येथे सामाजिक वनीकरण परिक्षेत्र रत्नागिरी यांच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत शाळा परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमात सामाजिक वनीकरण परिक्षेत्र रत्नागिरीचे अनिल दळवी (वनपाल), यशवंत सावर्डेकर (वनपाल) तसेच आरती खेडेकर (वनरक्षक) यांनी उपस्थित राहून वृक्षारोपणात सहभाग घेतला व विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.

तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर, पर्यवेक्षक अमर लवंदे तसेच शाळेचे कर्मचारी विजय साळुंखे यांनीही वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदविला. शाळेचे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला. वृक्षारोपणानंतर विद्यार्थ्यांनी वृक्षांचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेतली. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली असून परिसर हिरवागार ठेवण्याचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!