मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
शिवराज्याभिषेक दिनी आमदार प्रमोद जठार यांची गोपाळगडला भेट

गुहागर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण जगताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या राज्यभिषेक दिनी विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार तालुक्यातील अंजनवेल येथील गोपाळगडावर उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मानवंदना अर्पण करण्यात आली.
यावेळी भाजपा नेते तथा खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, गुहागर पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे यांच्यासह भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संकल्प अवेरे, अक्षय पवार, ओवैस चौगुले, प्रदीप भोसले, तसेच सर्व शिवप्रेमी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



