गणेशोत्सवाच्या काळात ग्रामीण भागात जाणाऱ्या बस सेवा पूर्ववत ठेवा
राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना आमदार किरण सामंत यांनी दिल्या सूचना

लांजा : लांजा- राजापूर विधानसभेचे आमदार किरण सामंत यांनी लांजा तालुक्यातील एसटी बस सेवेच्या वेळापत्रकाचा आज (२५ ऑगस्ट) आढावा घेतला. लांजा तालुक्यात गणेशोत्सवाच्यानिमित्ताने अनेक गणेश भक्त गावाकडे आले आहेत. त्यांना गावातून शहराकडे किंवा तालुक्यात येणाऱ्या जाण्यासाठी एसटी बसचा कोणतीही अडचण होऊ नये यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याचे आदेश लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी दिले आहेत. तालुक्याच्या बस सभेच्या वेळापत्रकासंदर्भात आढावा बैठक आज झाली. आलेल्या मुंबईकरांना कोणताही आर्थिक भू दंड पडू नये यासाठी बस सेवा सुरळीत करणे त्यांना योग्य ती सेवा देणे यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी उपाययोजना करा, अशाही सूचना यावेळेस देण्यात आल्या आहेत.

माझ्या मतदारसंघातील ग्रामीण भागातील कोणत्याही व्यक्तीची एसटी बसची तक्रार माझ्यापर्यंत येता कामा नये यासाठी आपण चांगले काम करा आणि आलेल्या जनतेची सेवा करा असेही आमदार किरण सामंत यांनी सांगितले. यावेळी लांजा बस डेपोच्या व्यवस्थापक काव्या पेडणेकर आणि अधिकारी उपस्थित होते.


