मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
एमबीबीएस पदवी संपादन केल्याबद्दल डॉ. मधुरा बोंडले यांचा भाजपा खेडतर्फे सत्कार

खेड : नगरपालिकेचे अधिकारी नागेश बोंडले यांची कन्या डॉ. मधुरा बोंडले यांनी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच मानल्या जाणाऱ्या एमबीबीएस पदवी यशस्वी संपादित केल्याबदल त्यांचा खेड भाजपच्या वतीने सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भाजपा नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे, शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा अल्पसंख्यांक रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सहिबोल, नगरसेविका वैभवी खेडेकर, युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, स्वराज गांधी, प्रणव मापुस्कर, सौ. बोंडले, ओवैस चौगुले, प्रदीप भोसले व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



