जि. प. शाळा नं. १ कुडली बंदर वाडी शाळेत दप्तराचे वितरण

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागातील जिल्हा परिषद शाळा नं.१ कुडली बंदर वाडी या शाळेत शिव-प्रभा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाज भूषण पुरस्कारप्राप्त आनंद शिवराम जाधव यांनी इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वितरण आणि खाऊ वाटप सोहळा उत्साहात संपन्न झाला. हा संपूर्ण कार्यक्रम सौ. दीक्षा प्रदीप सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याध्यापक सुधाकर निमकर यांच्या अधिपत्याखाली पार पडला.
शिव-प्रभा सामाजिक संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाचे आणि संस्थापक अध्यक्ष आनंद जाधव, ज्येष्ठ बंधू तुकाराम जाधव यांच्या सामाजिक कार्याचे सर्वच मान्यवरांनी कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर प्रमुख मान्यवर कुडली गावचे सरपंच नितीन गावणंग, निवृत्त रेल्वे अधिकारी संजयजी मोकल, ज्येष्ठ रक्तदाते आणि सामाजिक कार्यकर्ते विजू आप्पा कदम, ग्रामपंचायत अधिकारी सुनील कदम, ग्राम महसूल अधिकारी शुभम पिठले, भारतीय बुद्ध सासन सभा या संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण जाधव, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अनिल जाधव, शिवराय मावळे प्रतिष्ठानचे संस्थापक नितेश पांचाळ, शिव-प्रभा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आनंद जाधव, ज्येष्ठ बंधू तुकाराम शिवराम जाधव, मुख्याध्यापक सुधाकर निमकर, शिक्षक प्रकाश गुरसळे, दीपक कुनघाटकर, प्रसाद सपारे, शिक्षिका सौ. मनिषा पाटील, प्रदीप सुर्वे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष दिव्या कटनाक, साक्षी आनंद जाधव, मयुरी महेंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना शुभेच्छा तर दिल्याच त्याच बरोबर आनंद जाधव यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो अशाही शुभेच्छा दिल्या.
यावेळी आनंद शिवराम जाधव म्हणाले की, आई – वडिलांनी चालवलेला सामाजिक कार्याचा वसा घेऊन मी पुढे जात आहे. या माझ्या सामाजिक कार्यात माझ्या कुंटुंबाने मला सदैव सहकार्य करीत आहेत आणि रेल्वेचे अधिकारी संजय मोकल, अनंत कुवळेकर, शिवाजी बाबर, स्वप्ना आक्रे, संजय साळवी, प्रकाश दास, चेतन परमार या अधिकाऱ्यांनी सढळ हस्ते योगदान दिले आहे. हे ऊपक्रम करण्यासाठी मी दर महिना पगारातील १० टक्के रक्कम ही मुलांच्या शिक्षणासाठी वेगळी काढत असतो त्यातूनच असे कार्यक्रम होत असतात. यापुढेही आपण असेच कार्यक्रम चालू ठेवणार आहोत असेही आनंद जाधव यांनी आवर्जून सांगितले.
संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुधाकर निमकर यांनी केले व सर्वांचे आभार मानले. यावेळी मान्यवरांना आणि शिक्षकांना संजय मोकल यांनी चांगल्या दर्जाचे पेन भेट म्हणून दिले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन दीपक कुनघाटकर यांनी केले.



