मुख्य बातमी
जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवारी

रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीची बैठक उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, तहसीलदार कार्यालय इमारत, तिसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्र. जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांनी केले आहे.



