मुख्य बातमीसामाजिक

रत्नागिरीत २७ रोजी राधिका भिडे लाईव्ह शो

रत्नागिरी : आय पॉप स्टार गायिका राधिका भिडे हिने वाढदिवसानिमित्त राधिका भिडे लाईव्ह हा संगीतमय कार्यक्रम येत्या २७ जून रोजी आयोजित केला आहे. आतापर्यंत तिने वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवले असून या कार्यक्रमाद्वारे पुण्यातील साहस फाउंडेशन या संस्थेला मदत देण्यात येणार आहे.

भटक्या, जखमी कुत्र्यांवर उपचार करणारी ही सामाजिक संस्था आहे. २७ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात होणारा “राधिका भिडे लाईव्ह” हा कार्यक्रम रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आधीच हाऊसफुल्ल झाला आहे. ज्यांना या वेळी कार्यक्रम पाहाता येणार नाही, त्यांच्यासाठी लवकरच आणखी एक कार्यक्रम आयोजित करणार आहोत.

रत्नागिरीतील हा तिचा स्वतंत्र असा पहिलाच कार्यक्रम आहे. आतापर्यंत रत्नागिरीतील रसिकांनी तिला जे भरपूर प्रेम दिलं आहे, त्याबद्दल या कार्यक्रमातून ती कृतज्ञता व्यक्त करणार आहे. या कार्यक्रमात तिने लिहिलेली, संगीत दिलेली, गायलेली आणि संगीत संयोजन केलेली अशी गाणी ती गाणार आहे.

पत्रकारांशी बोलताना राधिकाने सांगितले की, “साहस फाउंडेशनचे काम मी जवळून पाहिले आहे. जखमी आणि बेवारस कुत्र्यांवर उपचार करून त्यांची काळजी घेण्याचे अत्यंत मोलाचे कार्य ही संस्था करत आहे. उपचारानंतर प्राण्यांना दत्तक देण्याचे कामही संस्था करते. या कार्याला अधिक बळ मिळावे आणि समाजापर्यंत त्यांची माहिती पोहोचावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!