मुख्य बातमीशैक्षणिक

शिर्के प्रशालेत जीएस पदासाठीची निवडणूक संपन्न

मतदानासाठी विद्यार्थ्यांनी तयार केले ॲप

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा. भा. शिर्के प्रशालेत २ जुलै रोजी प्रतिवर्षीप्रमाणे स्वराज्य आणि सांस्कृतिक विभागातर्फे विद्यार्थी प्रतिनिधी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी पदासाठीची निवडणूक पार पडली. यात इयत्ता दहावी ‘अ’मधील आदिती अनंत सावंत ही विद्यार्थिनींची प्रतिनिधी म्हणून, तर इयत्ता दहावी ’इ’ मधील संकेत सुनील पवार यांची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून बहुमताने निवड झाली.

निवडणुकीसाठी दहावीमधील एकूण दहा उमेदवार उभे होते. यामध्ये प्रेम विनोद पाटील, संकेत सुनील पवार, शार्विल प्रशांत साळुंखे, प्रतीक पुरंदर पुजारी, मानस मिलिंद जाधव, सोहम राजेंद्र देवरुखकर, गायत्री संदीप यादव, अरुणी अमित दुधाळे, रिद्धी अजय लिंगायत, आदिती अनंत सावंत यांचा समावेश होता. इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा अनुभव घेतला. निवडणुकीच्या सर्व कामकाजासाठी सर्व शिक्षक वृंद व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

यावर्षी ही निवडणूक प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या संगणकीय ॲप द्वारे यशस्वीरित्या घेण्यात आली. हे ॲप प्रशालेतील शिक्षक विलास मुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गौरेश कोकरे, सुयश खापरे, सर्वेश नागले, तन्मय कोकरे या विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत घेऊन हे तयार केले. प्रशालेचे मुख्याध्यापक के. डी. कांबळे, उपमुख्याध्यापिका सौ. पी. एम. पवार, पर्यवेक्षिका सौ. पी. एस. कांबळे यांनी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!