मुख्य बातमी

रत्नागिरी प्रभाग क्र. ४ मध्ये एनसीएमसी स्मार्ट कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : नगरपालिका प्रभाग क्रमांक ४ कोकणनगर, कीर्तिनगर व नगरपालिका वसाहतीतील ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी आयोजित पहिल्याच एनसीएमसी स्मार्ट कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राज्य शासनाने व एसटी महामंडळाने सर्व महिला व ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासामध्ये सवलत दिलेली आहे आणि त्या सुविधा पुढे चालू राहण्यासाठी शासनाने एनसीएमसी स्मार्टकार्ड बंधनकारक केले आहे. हे कार्ड काढण्यासाठी शासनाने एसटी स्टँड येथे केंद्र उपलब्ध करून दिलेले आहे. तालुक्याच्या ठिकाणी एकच केंद्र असल्यामुळे नागरिकांची प्रचंड गर्दी असते व त्यांना तासंतास रांगेत थांबावे लागते. हे कार्ड आपल्या प्रभागातील महिला व ज्येष्ठ नागरिकांना सोयीस्कर रित्या कशा प्रकारे उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून रत्नागिरी नगरपालिका प्रभाग क्रमांक ४ कोकणनगर, कीर्तिनगर व नगरपालिका वसाहतीचे नगरसेवक केतन उमेश शेट्ये व फौजिया मुजावर तसेच महापुरुष मित्रमंडळ कोकणनगर चे सदस्य विशाल कदम यांनी एस.टी महामंडळ यांच्याशी संपर्क साधून प्रभागातील नागरिकांसाठी प्रभागात शिबिर आयोजित करण्यात आले.

या शिबिरामध्ये सुमारे दीडशे महिला व ज्येष्ठ नागरिकांनी आपले स्मार्ट कार्ड काढत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांचे आभार मानले. विशेष बाब म्हणजे हे शिबिर रत्नागिरी तालुक्यातले पहिलेच कार्ड नोंदणी शिबिर आहे जे प्रभाग क्रमांक ४ मध्ये आयोजित केले होते. प्रभागातील ज्येष्ठ नागरिक सौ. विशाखा पाटोळे यांनी स्थानिक नगरसेवक प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन वेळोवेळी अनेक प्रकारची लोकउपयोगी शिबिर आयोजित करतात व त्या माध्यमातून शासनाच्या सर्व उपक्रमांचा लाभ आपल्याच प्रभागात घेता येतात. त्यासाठी नगरसेवकांचे विशेष आभार मानले व असेच नागरिकांच्या लोकहिताची कामे पुढेही करत राहावे ह्या शुभेच्छा दिल्या.

या शिबिरास एसटी महामंडळाचे अधिकारी श्री. खरे व सनवील एंटरप्राइजेसचे व्यवस्थापक संदीप चव्हाण यांचे विशेष हातभार लागले. हे शिबिराला यशस्वी करण्यासाठी नगरपालिक वसाहत गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष किशोर भुते, हनुमान मित्र मंडळ महिला सदस्या कामिनी महाडिक व सौ. रुचिता भाटकर, महापुरुष मित्रमंडळ सदस्या निकिता खवरे, समता मित्रमंडळ कीर्तीनगर सदस्या स्नेहल सावंत व सौ. मैहरून्निसा साखरकर यांची विशेष साथ लाभली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!