आयटीआय संगमेश्वर येथे वास्तुविशारद सल्लागार पदासाठी नियुक्ती; २८ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

संगमेश्वर : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) विविध विकासकामांसाठी आणि इमारत दुरुस्तीसाठी वास्तुविशारद सल्लागाराची (Architect Consultant) नियुक्ती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपली दरपत्रके २८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संस्थेच्या कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन आयएमसी ऑफ आयटीआय संगमेश्वरचे सदस्य सचिव यांनी केले आहे.
संगमेश्वर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’ (PPP) अंतर्गत संस्था व्यवस्थापन समिती (IMC) कार्यरत आहे. या समितीकडे उपलब्ध असलेल्या विकास निधीचा विहीत पद्धतीने योग्य कामांसाठी वापर करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
समितीकडे उपलब्ध निधीतून संस्थेमध्ये कामे केली जाणार असून, नियुक्त होणाऱ्या वास्तुविशारद सल्लागारावर त्याची जबाबदारी असेल. नवीन इमारतीचे मुख्य आराखडे (Architectural Designs) तयार करणे, जुन्या इमारतीची दुरुस्ती, नूतनीकरण आणि अंतर्गत सजावट (Interior) करणे,
आरसीसी डिझाईन (RCC Design) आणि स्ट्रक्चरल स्टील डिझाईन निश्चित करणे, कामांचे अचूक व सविस्तर अंदाजपत्रक (Estimates) तयार करणे, प्रत्यक्ष काम सुरू असताना त्यावर बारकाईने देखरेख आणि नियंत्रण ठेवणे.
या पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकृत पॅनेलवर असणे बंधनकारक आहे. इच्छुक उमेदवारांनी आपली दरपत्रके आणि त्याकरिता आकारला जाणारा व्यावसायिक मोबदला (Professional Fees) हस्तदेय (बाय हँड) स्वरूपात सादर करायचा आहे. शासकीय सुट्ट्या वगळून कार्यालयीन वेळेत २८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर यांच्या कार्यालयात अर्ज स्वीकारले जातींल, असे संस्था प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



