क्रीडामुख्य बातमी

स्वरा साखळकर हिला तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

रत्नागिरी : देवरुख (ता. संगमेश्वर) येथे नुकत्याच झालेल्या जिल्हा अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेत एसआरके क्लबची राष्ट्रीय खेळाडू स्वरा साक्षी विकास साखळकर हिने उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत कॅडेट मध्ये ५५ किलो खालील वजनी गटांमध्ये सुवर्णपदक संपादन केले.

स्वराने या आधी राज्य व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदक संपादन केले आहे. रत्नागिरी नगरपालिका शाळा क्रमांक १५ दामले विद्यालयची विद्यार्थिनी आहे. स्वराला एसआरके तायक्वांदो क्लबचे प्रमुख प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच शाहरुख शेख यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

तिने मिळवलेल्या या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे खजिनदार व जिल्हाध्यक्ष व्यंकटेश्वर कररा, उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त तायक्वांदो प्रशिक्षक मिलिंद भागवत यांनी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर एसआरके क्लबचे अध्यक्ष अमोल सावंत, उपाध्यक्ष वीरेश मयेकर, सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य निखिल सावंत, प्रफुल्ल हतिसकर, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग आणि समस्त पालक यांनीही स्वराचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!