मुख्य बातमी
माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षण समितीची शुक्रवारी बैठक

रत्नागिरी : माजी सैनिकांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार (३१ जुलै) दुपारी १२ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे.
ज्या माजी सैनिकांना कौटुंबिक संरक्षण संदर्भात तक्रारी असल्यास नमूद बैठकीस आपला अर्ज व संबंधित कागदपत्रासह विहीत वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी यांनी केले आहे.


