मुख्य बातमी

विमुक्त जाती, भटक्या जमाती व ओबीसी उद्योजकांसाठी विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

रत्नागिरी : विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांना आर्थिक बळ देण्यासाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातर्फे विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर. एस. नरवडे यांनी केले आहे.

उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी या योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत. उपलब्ध कर्ज योजनांची माहिती अशी : थेट कर्ज योजना – रु. १ लाखापर्यंत. बीज भांडवल कर्ज योजना – २५ टक्के बीज भांडवल. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना – १० लाखांपर्यंतची कर्ज मर्यादा. गट कर्ज व्याज परतावा योजना – रु. १० लाख ते जास्तीत जास्त रु. ५० लाखांपर्यंतची कर्ज मर्यादा.

या कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच अटी व शर्तींच्या सविस्तर माहितीसाठी इच्छुकांनी डॉ. बाबासाहेब सामाजिक न्याय भवन, ५ वा मजला, पाटबंधारे स्टॉप, कुवारबाव, जिल्हा रत्नागिरी – ४१५६३९. दूरध्वनी क्रमांक: ०२३५२-२३००६३ येथे अथवा राहुल सुखदेव नरवडे (९९२३१९२४१४) यांच्याशी संपर्क साधावा.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण आणि होतकरू उद्योजकांनी या संधीचा फायदा घेऊन आपले व्यवसाय यशस्वीपणे उभारावेत, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

ई-मेल आयडी : vjntratnagiri@gmail.com

अधिकृत वेबसाईट : www.vjnt.org

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!