मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आबलोली येथे ३० रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांच्या वतीने आणि जिल्हा आरोग्य रुग्णालय यांच्या सहकार्याने आबलोलीतील गारवा कृषी पर्यटन केंद्राचे मालक आणि राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी सचिन कारेकर यांच्या गारवा कृषी पर्यटन केंद्रात ३० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी स्वयंपूर्ण सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, उपसरपंच अक्षय पागडे, १०० वेळा रक्तदान करणारे आप्पा कदम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. रक्तदात्यांनी नाव नोंदणीसाठी सरपंच सौ. वैष्णवी नटके (९४०४३२६३७७), उपसरपंच अक्षय पागडे (७५८८६९६१६२), विजय पागडे (९४०५२५८२०९), प्रमेय आर्यमाने (९४०३१४३१४३), सचिन कारेकर (९४२३१२९७९६) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!