मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

वनौषी देऊळवाडी आदिवासी वस्ती येथे ‘सेवा संकल्प’ व ‘राष्ट्रीय पोषण अभियान’

रत्नागिरी : वनौषी देऊळवाडी येथील आदिवासी वस्तीमध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत “सेवा संकल्प अभियान” व “राष्ट्रीय पोषण अभियान” राबविण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक महिला व ग्रामस्थांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ICDS च्या प्रकल्प अधिकारी अंकिता महाडिक उपस्थित होत्या. त्यांनी महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या योजनांचा आढावा घेत मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने राज्य शासनाची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ‘लेक लाडकी योजना’, केंद्राची ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ तसेच बालकांसाठी दिल्या जाणाऱ्या ‘बेबी केअर किट’ वाटपाबाबत महिलांना माहिती दिली व पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा आवर्जून लाभ घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमादरम्यान पोषणाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘पोषण आरती’ व ‘पोषण गीत’ सादर करण्यात आले, ज्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या उपक्रमास गावचे पोलीस पाटील, बचत गटाच्या अध्यक्षा, आदिवासी वस्तीचे वाडी अध्यक्ष विनायक पवार, स्थानिक महिला, ग्रामस्थ, अंगणवाडी लाभार्थी, अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थितांच्या सहकार्याने हा जनजागृती उपक्रम उत्साहात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!