मुख्य बातमी

आंबेरे खुर्द तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाते यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आंबेरे खुर्दच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गणपत पाते यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली.

सोमवारी (१७ऑगस्ट) निर्मल ग्रामपंचायत आंबेरे खुर्द या ग्रामपंचायतची ग्रामसभा विश्वास खर्डे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाली. यावेळी आंबेरे खुर्दच्या महात्मागांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सर्व समावेशक लोकप्रिय अनुभवी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाते यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. गुहागर तालुक्यातून पांडुरंग पाते यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

श्री. पाते सध्या गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेडचे तसेच गुहागर बाजार शृंगारतळीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा तालुका गुहागर (ग्रामीण) चे अध्यक्षपद, ओबीसी संघर्ष समन्वय समिती गुहागरचे अध्यक्ष तसेच भाग्योदय ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था, पाचेरी आगरचे सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!