मुख्य बातमी

पावसापासून संरक्षणासाठी ‘वॉटरप्रूफ’ लिफाफे आणि ‘पार्सल पॅकेजिंग’

"टपाल विभागाचे विशेष नियोजन : सातासमुद्रापार राखी पाठवण्यासाठी 'आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट' सज्ज

रत्नागिरी : रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर दूरदेशी असलेल्या लाडक्या भावापर्यंत केवळ राखीच नव्हे, तर भेटवस्तू, कपडे, मुद्रा किंवा खास आठवणी सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी टपाल विभाग सज्ज झाला आहे. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन टपाल विभागाने खास ‘वॉटरप्रूफ’ लिफाफे आणि ‘पार्सल पॅकेजिंग’ सुविधा उपलब्ध करून दिली असून, नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले आहे.

सणासुदीच्या काळात राखी पाठवणाऱ्या बहिणींना प्रोत्साहन देण्यासाठी टपाल विभागाने विशेष आर्थिक सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार स्पीड पोस्टद्वारे राखी किंवा भेटवस्तूंचे बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना टपाल शुल्कामध्ये १० टक्के सवलत दिली जात आहे.

पावसामुळे टपाल भिजून खराब होण्याची भीती असते. यावर उपाय म्हणून टपाल विभागाने आकर्षक, देखणे आणि उच्च प्रतीचे खास ‘वॉटरप्रूफ’ लिफाफे विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. या मजबूत लिफाफ्यांमुळे राखी व सोबत पाठवलेली भेटवस्तू पूर्णपणे सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.

केवळ देशांतर्गतच नव्हे, तर अमेरिका, युरोप, आखाती देशांसह परदेशात स्थायिक असलेल्या भावांसाठी ‘आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट’ची (International Speed Post) स्वतंत्र व गतिमान व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. ही सुविधा जिल्ह्यातील सर्व डाकघरांमध्ये उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी नागरिकांनी नजीकच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा किंवा रत्नागिरी टपाल विभागाच्या ८६६९९९९८६० या व्हॉटस्ॲप क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!