मुख्य बातमी

श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाच्या मार्तंड झोरे याने नेमबाजीत पटकावले सुवर्णपदक

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या कोकण झोन-४ अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला नेमबाजी स्पर्धेमध्ये श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयातील विद्यार्थी मार्तंड झोरे याने ओपन साइट एअर रायफल या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

ही स्पर्धा वेंगुर्ला येथील कांचन उपकर शुटिंग रेंज, कॅम्प मैदान येथे आयोजित करण्यात आली होती. मार्तंडने आपल्या नेमबाजीतील अचूकता, कौशल्य आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले.

मार्तंडच्या या यशाबद्दल श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. आशिष बर्वे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱी आणि महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले. तसेच त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!