मुख्य बातमी

राजा शिवछत्रपती परिवाराच्या वतीने ६ सप्टेंबरला किल्ले रत्नदुर्गची स्वच्छता मोहीम

रत्नागिरी : राजा शिवछत्रपती परिवार, रत्नागिरी परिवार यांच्या वतीने शहराजवळील ऐतिहासिक किल्ले रत्नदुर्गच्या स्वच्छता व संवर्धनासाठी राजा शिवछत्रपती परिवार, रत्नागिरी परिवार यांच्या वतीने स्वच्छता मोहीम क्र. ९० आयोजित करण्यात आली आहे. ही मोहीम येत्या रविवारी (६ सप्टेंबर) सकाळी ७.३० वाजता किल्ले रत्नदुर्ग येथे होणार आहे. मोहिमेदरम्यान किल्ला परिसरातील वाढलेली झाडे-झुडपे, गवत व कचरा हटवून परिसर स्वच्छ करण्याचे कार्य केले जाणार आहे.

गड-किल्ले हे आपल्या इतिहासाचे आणि संस्कृतीचे अमूल्य ठेवे आहेत. त्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. या उद्देशाने राजा शिवछत्रपती परिवार, रत्नागिरी परिवार सातत्याने स्वच्छता व संवर्धनाच्या माध्यमातून गडप्रेमी आणि नागरिकांना सहभागी करून घेत आहे.

या ९० व्या स्वच्छता मोहिमेत शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, युवक, नागरिक आणि इतिहासप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!