महाराष्ट्रमुख्य बातमी

जरांगे पाटलांचे उपोषण मागे; उदय सामंतांची पुन्हा एकदा यशस्वी शिष्टाई

मुंबई : मराठा आंदोलनाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण सोडण्याचा तसेच आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. जरांगे यांचे आंदोलन स्थगित व्हावे आणि या विषयावरची चर्चा पुढे सरकावी यासाठी थेट “पॅरिसमधून सूत्रे हलली”! राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पॅरीसमधून जवळपास साडेतीन तासाच्या अथक शिष्टाईनंतर तोडगा काढण्यात यश मिळवले.

उद्योगमंत्री उदय सामंत हे अंतराळ क्षेत्रातील गुंतवणूक व संशोधन विषयावरील एका परिषदेत सहभागी होण्यासाठी पॅरिस येथे गेले होते. दरम्यान जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतल्यानंतर संकटमोचक म्हणून उदय सामंत यांच्याकडे पाहिले जात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोपवलेल्या जबाबदारीनुसार उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद जारी ठेवला.

चर्चेचा घटनाक्रम… काय घडलं पडद्या मागे

काल दिवसभरात ना. उदय सामंत किमान सात वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील उदय सामंत यांनी चर्चा केली, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वरिष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड व उदय सामंत यांच्यामध्ये कॉन्फरन्स कॉलवर चर्चा झाली. या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांच्या निकटवर्तीयांशी उदय सामंत यांची चर्चा झाली. त्यानुसार गणेशोत्सव पाहता जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावे व त्यांच्या सर्व मागण्यांवर शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!