मुख्य बातमी

मत्स्यव्यवसाय विभागाने सर्व बोटींची नोंदणी करून अहवाल द्यावा; एमआयडीसी, पोलीस, एमपीसीबी, एफडीए यांनी कारखान्यांना भेट द्यावी : जिल्हाधिकारी मनुज जिंदल

नार्को को-ओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक

रत्नागिरी : मासेमारीसाठी जाणाऱ्या सर्व बोटींची नोंदणी फिशरीज विभागाने करून अहवाल द्यावा. एमआयडीसी, पोलीस, एमपीसीबी, एफडीए यांनी कारखान्यांमध्ये अचानक भेटी देऊन तपासणी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिल्या.

नार्को को-ओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक मंगळवारी झाली. बैठकीला प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आदी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे,अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, क्षेत्रीय स्तरावरील पोलीस उपअधीक्षक आणि उप विभागीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले, प्रत्येक विभागाने वर्षभरात काम करणार, दिलेल्या जबाबदारीची अंमलबजावणी याबाबतचे नियोजन करावे. शिक्षण विभागाने शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती करावी. या समितीबाबत केंद्र शासन आणि राज्य शासन सनियंत्रण करत असते. त्यामुळे दिलेली जबाबदारी सर्व विभागाने पार पाडावी. अंमली पदार्थाच्या विरोधात जनजागृती करावी. त्याशिवाय जास्तीत जास्त कारवाई करावी.

पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांनी सर्व विभागांना देण्यात आलेल्या जबाबदारी बाबत सविस्तर माहिती दिली. ग्रामसभेमधून सेवा संकल्पमधून अंमली पदार्थाच्या विरोधात पोलीस विभागामार्फत जनजागृती केली जात आहे. बंदर विभागाने पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाला सोबत घेऊन नियमित तपासणी करावयाची आहे. २०२९ पर्यंत नशामुक्त भारत करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी पूर्ण करायची आहे. अन्न व औषध विभागाकडून नियंत्रित औषधे नशेसाठी वापर होता का याबाबत तपासणी करावयाची आहे.

पोलीस विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांनी सविस्तर माहिती दिली. २२ ग्रॅम ब्राऊन हिरॉईन, २७८५ किलो गांजा जप्त करून २० दिवसात २५ गुन्हे आणि ३५ आरोपींना अटक केले आहे. मागील वर्षी १२४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गांजा, ब्राऊन हिरॉईन सेवनाचे प्रमाण नेपाळी कामगारांमध्ये जास्त आहे. त्यासाठी बोटींची तपासणी व्हायला हवी. एकूण ६० कारवाईत ८६ आरोपींना अटक करण्यात आल्याचे ते म्हणाले.

प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी २३ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी एनडीपीएस अंतर्गत सहा जणांना हद्दपार केले आहे. आजअखेर त्यांनी एकवीस जणांना हद्दपार केले आहे. नार्कोटीक ड्रग्ज ॲण्ड सायकोट्रोफिक ॲक्ट १९८५ एनडीपीएस अंतर्गत २३ सप्टेंबर रोजी एकाच दिवसात सचिन राजाराम म्हापूसकर, अरमान लियाकत धामस्कर, नजब असीफ मिरजकर, मस्तान मकदुम शेख, फुरकान यासिन फणसोपकर, अब्दुल रौफ इक्बाल डोंगरकर अशा सहा जणांना हद्दपार केले आहे. २०२३ पासून आज अखेर त्यांनी २१ जणांना एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!