मुख्य बातमी

‘पोषण माह व मानसिक आरोग्य कार्यशाळा’ आज 

रत्नागिरी : जि. प. महिला व बालविकास आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आज (८ ऑक्टोबर) स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे ‘पोषण माह व मानसिक आरोग्य कार्यशाळा – २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. महिला, किशोरवयीन मुले-मुली आणि मातांच्या सर्वांगीण आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता पूर्वतयारी व आरोग्य तपासणी शिबिराने होईल. यामध्ये उपस्थितांसाठी एचबी, शुगर व इतर वैद्यकीय तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. सकाळी १०.३० वाजता सुरू होणाऱ्या मुख्य कार्यसत्रात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. शासकीय नर्सिंग स्कूलच्या प्राचार्य श्रुती आंबेकर या किशोरावस्थेतील शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी यावर मार्गदर्शन करतील. तसेच या सत्रात स्त्री भ्रूणहत्याविषयक प्रबोधनपर पथनाट्य सादर केले जाईल.

प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरिणाक्षी गोसावी गरोदर व स्तनदा मातांमधील प्रसूतीपश्चात नैराश्य आणि त्यावरील उपायांवर माहिती देतील. यासोबत सेविकांची प्रेरणादायी ‘यशोगाथा’ सादर केली जाईल. जिल्हा रुग्णालयाच्या आहारतज्ज्ञ कविता जाधव या संतुलित आहार व पोषणाबाबत मार्गदर्शन करणार असून, बालरोगतज्ज्ञांचे मार्गदर्शन व ‘पोषण मंगळागौरी’ हा विशेष पूरक उपक्रम या सत्राचे आकर्षण असेल. दुपारी १ वाजता या कार्यशाळेचा समारोप व आभार प्रदर्शनाने सांगता होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!