मुख्य बातमी

रत्नागिरीत १७ ऑक्टोबरला सारस्वत स्नेहवर्धक मंडळातर्फे नवरात्रोत्सवाचे आयोजन

महिला मंडळ सभागृहात धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह नवरात्रोत्सवाचा जागर

रत्नागिरी : सारस्वत स्नेहवर्धक मंडळातर्फे शनिवारी (१७ ऑक्टोबर) नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मारुती मंदिर येथील महिला मंडळ सभागृहात सायंकाळी ४ ते ८ या वेळेत हा उत्सव होणार आहे.

रत्नागिरीत सारस्वत मंडळाने अनेक वर्षांपासून नवरात्रोत्सवाची परंपरा जपली आहे. यानिमित्त श्री सरस्वती देवीचे पूजन, आरती, भजन, गायन, वादन, नृत्य आदी कार्यक्रम होणार आहेत. महिलांना एकत्र येण्यासाठी आणि कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे. यावेळी भेटीगाठी, गप्पा आणि आठवणींनाही उजाळा मिळणार आहे.

रांगोळी काढण्याची आवड असलेल्या महिलांसाठी दुपारी ३ वाजल्यापासून सभागृह उपलब्ध असेल. कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपले नाव, सादरीकरणाचा प्रकार आणि त्यासाठी लागणारा अंदाजित कालावधी याची माहिती आयोजकांकडे मिलिंद साखळकर (७७७७४०४३००) प्रदीप तेंडुलकर (९४०३५०८२३६) यांच्याकडे व्हॉट्सॲपद्वारे द्यावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!