मुख्य बातमी

वीज ग्राहकांशी संवाद वाढवा, १०० टक्के स्मार्ट मीटर बसवा; वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा देण्याचे आवाहन 

महावितरणचे कार्यकारी संचालक (वाणिज्य) संदीप पाटील यांचे निर्देश

रत्नागिरी : वीज ग्राहकांनी वापरलेल्या वीजेचे चालू बिल व थकबाकी वसूल करा. रत्नागिरी परिमंडलातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी शून्य थकबाकीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करा. ग्राहकांना अखंड वीज पुरवठा देण्याच्या दृष्टीने यंत्रणेची नियमित देखभाल दुरुस्ती करा, आपत्कालीन स्थितीत वीज पुरवठा खंडित झाल्यास त्याचा कालावधी कमीत कमी ठेवा, स्मार्ट मीटर बसविण्याबाबत ग्राहकांशी संवाद वाढवा व १०० टक्के स्मार्ट मीटर बसविण्याचे उद्दिष्ट पुर्ण करा, असे निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक (वाणिज्य) संदीप पाटील यांनी दिले.

महावितरणच्या कोकण परिमंडल रत्नागिरी येथील सभागृहात थकबाकी कमी करणे, वीज ग्राहकांना चांगली व दर्जेदार सेवा देणे या अनुषंगाने आढावा बैठकीत कार्यकारी संचालक (वाणिज्य) संदिप पाटील बोलत होते. यावेळी रत्नागरी परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये, रत्नागिरी मंडलाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, सिंधुदुर्ग मंडलाचे अधीक्षक अभियंता अभिमन्यु राख, पायाभुत आराखडा अधीक्षक अभियंता अजय शिंदे उपस्थित होते.

यावेळी ग्राहकसेवा व वीज बिल थकबाकीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात थकबाकी लक्षणीयरीत्या कमी झाली पाहिजे. याकरता वसुली मोहिमा अधिक तीव्र करा, वीज चोरी विरोधात मोहिम तीव्र करा, थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा त्वरीत खंडीत करा. आवश्यक तेथे एबी स्विच बसवा, कंडक्टर बदला, लाईन क्रिंपिंग करा, शक्य तिथे रिंग फीडिंगचा पर्याय उभा करा, गार्डिग करा. यामुळे महसूल तूट व अपघात यांचे प्रमाण कमी होईल. वीज बील वेळेत भरणाऱ्या ग्राहकांना चांगला व दर्जेदार वीज पुरवठा करा, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी दोन्ही जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंते, परिमंडल कार्यालयातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!