पाटपन्हाळे येथे १० नोव्हेंबरला रंगणार “खेळ पैठणीचा, सन्मान होम मिनिस्टरचा” कार्यक्रम

आबलोली (संदेश कदम) : दिवाळीच्या सुट्टीत खास महिलांसाठी मनोरंजनाची पर्वणी उपलब्ध करण्यात आली असून, पारमी प्रॉडक्शन, मुंबई आणि गुहागर तालुका कला मंच प्रस्तुत “खेळ पैठणीचा, सन्मान होम मिनिस्टरचा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायत (पाटपन्हाळे – शृंगारतळी) सभागृह येथे १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हा कार्यक्रम होईल.
या खेळात प्रथम येणाऱ्या १०० महिलांना सहभागी होण्याची संधी मिळणार असून, प्रवेश विनामूल्य आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन दिवाळीचा आनंद द्विगुणीत करावा व टीम सोबत काम करणाऱ्या इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य संपर्क व नोंदणीसाठी सौ. दीपाली रवींद्र पवार (9595620112) टीव्ही मालिका निर्मिती प्रबंधक रवींद्र पवार आणि निवेदिका पारमी दीपाली रवींद्र पवार यांनी केले आहे.
पैठणीच्या कार्यक्रमात जबरदस्त गाणी आणि जबरदस्त धमाल याचबरोबर मानाची पैठणी आणि १० विशेष बक्षिसे अशी बक्षीसांची बरसात होणार आहे. तसेच जाहिरात, देणगीदार विविध प्रकारची बक्षिसे देणाऱ्या देणगीदारांचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. गुहागर तालुक्यातील महिलांनी या खेळात बहुसंख्येने लाभ घ्यावा या खेळात महिला, सासू – सूना जोडीदारांना खास मनोरंजनाची संधी असून या संधीचा लाभ घ्यावा. सुदेश हडकर (शृंगारतळी 7875082464), अमृता तांबे (मळण 9869543208), अभिजीत बणे (भातगाव 9167246856), अमोल जामसुतकर (9764139693), संतोष बेकरे (वाडदई 8169338819), अमित काताळे (वाकी 9870583216), विलास सोलकर (वाकी 9892325456), अमित फोपळे (तळवली 9527314696), धीरज पवार (तळवली 8390704523), उज्ज्वल पवार (गुहागर 9421543829), मिलिंद ठीक (गुहागर 7558229046), प्रशांत भेकरे (पाटपन्हाळे 9594984209), सचिन पवार (अंजनवेल 9004267459), राजेंद्र मोरे (मुसलोंडी 8421587690), रवींद्र कदम (कुटगिरी 9769988604) यांच्याशी संपर्क साधावा.



