जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध
१४ ऑक्टोबरपर्यंत हरकती, सूचना संबंधित निवडणूक विभाग तहसीलदारांकडे नोंदविता येणार

रत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे. या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर मतदारांना व नागरिकांना ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबरपर्यंत हरकती किंवा सूचना संबंधित निवडणूक विभागाचे तहसीलदार यांच्याकडे दाखल करता येतील. १४ ऑक्टोबर नंतर प्राप्त होणाऱ्या हरकती किंवा सूचना संबंधित तहसीलदार यांच्याकडे विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी कळविले आहे.
सन २०२५ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडील २३ सप्टेंबर २०२५ च्या पत्रानुसार रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी ८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या कार्यालयातील फलकावर, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या कार्यालयातील फलकावर, तहसीलदार मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर यांच्या कार्यालयातील फलकावर, पंचायत समिती मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर,संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर यांच्या कार्यालयातील फलकावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर मतदारांना व नागरिकांना ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबरपर्यंत हरकती किंवा सूचना संबंधित निवडणूक विभागाचे तहसीलदार यांच्याकडे दाखल करता येतील. १४ ऑक्टॉबरनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती किंवा सूचना संबंधित तहसीलदार यांच्याकडे विचारात घेतल्या जाणार नाहीत.



