मुख्य बातमी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पद पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

रत्नागिरी : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे शासनातर्फ नवयुवक व युवतीसाठी ३ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. ६३ आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रत्नागिरी येथे २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मुलाखतीस हजर राहावे.

मुलाखतीस येतेवेळी त्यांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर पुणे यांच्या वेबसाईटवर सर्च करून त्यामधील एसएसबी-६३ कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेवून यावे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणर्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. प्रशिक्षणार्थीनी केंद्रामध्ये २ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता उपस्थित रहावे.

एस. एस. बी. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढील कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबंधीचे प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेवून यावेत. कंम्बाईड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (सीडीएसई-यूपीएससी) अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी एक्झामिनेशन (एनडीए-यूपीएससी) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी ‘सी’ सर्टिफिकेट ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस. एस. बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली (युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किम) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एस. एस. बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com किंवा दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ किंवा व्हाटसअप क्र. ९४२३०३४५४४ वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी संपर्क करावा असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नागिरी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!