मुख्य बातमीशैक्षणिक

मेर्वी जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळेत डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत माजी राष्ट्रपती स्व. डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक हिदायत भाटकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी विषय शिक्षिका सौ. शर्वरी करगुटकर, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर, उपशिक्षिका संजया पावसकर ऐश्वर्या गुरव, शालेय मुख्यमंत्री मैत्रेयी अभ्यंकर, उपमुख्यमंत्री रचित म्हादये आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली होती.

या कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री. भाटकर, विषय शिक्षिका सौ. करगुटकर, उपशिक्षक श्री. पेटकर यांनी माजी राष्ट्रपती स्व. डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनातील प्रसंग आपल्या मनोगतातून कथन केले. त्यानंतर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांने पुस्तकांचे वाचन करण्याच्या उद्देशाने शालेय ग्रंथालयातील पुस्तके मुलांना देण्यात आली आणि सर्व विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणादिना निमित्त पुस्तक वाचन केले.

उपशिक्षिका संजया पावसकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!