मुख्य बातमी
मेर्वीतील श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा, सकाळी ८ वाजता स्वामी पादुकांवर अभिषेक केला जाईल. दुपारी १२ वाजता पालखी प्रदशिणा होईल. दुपारी १२.३० वाजता आरती होऊन दुपारी १ ते ३ यावेळेत महाप्रसादाचे वाटप केले जाईल.
या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी सहदेव पावसकर यांनी केले आहे.



