मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
बळीराज सेनेच्या संगमेश्वर तालुकाध्यक्षपदी कृष्णा डावल यांची नियुक्ती

आबलोली (संदेश कदम) : बळीराज सेना पक्षप्रमुख अशोक (दादा) वालम यांच्या आदेशानुसार संगमेश्वर तालुका अध्यक्षपदी कृष्णा डावल यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत संगमेश्वर तालुका येथे पदग्रहण सोहळा उत्साहात आयोजित केला जाणार आहे.
यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते सुरेश भायजे, दक्षिण रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष तानाजी कुळ्ये, जिल्हा उपाध्यक्ष दत्ताराम लांबे, जिल्हा संपर्क प्रमुख संतोष टक्के, सचिव श्री. पाटोळे तसेच सुरेश कानाल आणि नवी मुंबई-ऐरोली विधानसभा अध्यक्ष राजेंद्र जोशी, सुनील फेपडे आदी मान्यवर यावेळी या सोहळ्याला उपस्थित राहणार आल्याची माहिती उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पराग कांबळे यांनी दिली.



