मुख्य बातमी

“माविम” आणि अपूर्वा किरण सामंत फाउंडेशन तर्फे महिला दिनी कार्यक्रम

रत्नागिरी : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत लोक संचालित साधन केंद्र लांजा आणि अपूर्वा किरण सामंत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनी प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे महिलांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

“माविम”चे जिल्हा समन्वय अधिकारी अंबरीश मिस्त्री, अपूर्वा किरण सामंत फाउंडेशनच्या सचिव अपूर्वा किरण सामंत, CMRC च्या अध्यक्ष दीपाली राडीये यांच्यासह इतर प्रशासकीय महिला आणि बचत गटातील महिला उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा समन्वय अधिकारी अंबरीक्ष मिस्त्री यांनी “माविम”ची संकल्पना मांडली.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी अपूर्वा फाउंडेशन सतत प्रयत्नशील असून, महिलांचा आर्थिक आणि उद्योजकीय प्रगती ही अपूर्वा फाउंडेशनच्या मदतीने नक्की पूर्ण करू, असे आश्वासन अपूर्वा सामंत यांनी दिले. तसेच लांजामधील महिलांसाठी गारमेंट उभारणार असल्याचे आश्वासन देखील अपूर्वा फाउंडेशनतर्फे देण्यात आले.

यावेळी महिलांनी त्यांच्या दैनंदिन आहारात सकस अन्नाचा व तीन रंगांचा आहाराचा समावेश करावा यासाठी तिरंगा थाळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बचत गटातील महिलांनी विविध प्रकारचे अन्नपदार्थ बनवून देण्यात आले. या स्पर्धेच्या विजेत्यांना अपूर्वा फाउंडेशनमार्फत रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!