मुख्य बातमी

डिसेंबरमधील लोकशाही दिन आचारसंहितेमुळे रद्द

रत्नागिरी : राज्य निवडणूक आयोगाकडील ४ नोव्हेंबर सोबतच्या सहपत्रानुसार राज्यातील २४६ नगरपालिका व ४२ नगरपंचायतीच्या सदस्य व अध्यक्ष पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम ६ नोव्हेंबर रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच ६ नोव्हेंबरपासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ३ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यातील १ डिसेंबर रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आचारसंहिता असल्याने होणार नसल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) विश्वजीत गाताडे यांनी दिली.

जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. डिसेंबर महिन्याचा लोकशाही दिन १ डिसेंबर रोजी दुपारी १ ते २ या वेळेत होणार होता तथापि निवडणूक आचारसंहितेमुळे सदर लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!