दी बुद्धिस्ट सोसायटी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा

रत्नागिरी : दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा तालुका शाखा रत्नागिरी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आज (२६ नोव्हेंबर) ७५ वा भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. भारतीय संविधानाची पुस्तिका यांचा पुष्पवृष्टी करून सन्मान करण्यात आला. त्रिशरण पंचशील पठण करण्यात आले.
या वेळी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा महासचिव बी. के. कांबळे यांनी भारतीय संविधानाची प्रस्ताविका वाचून शपथ दिली. त्यानंतर मुकुंद कांबळे, अभिजित तांबे, शिवराम कदम, अस्मिता कांबळे, स्मिता कांबळे, दत्ताराम कांबळे, दीपक जाधव, एल. व्ही. पवार आणि आयुष अभिजित तांबे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी कार्यक्रमास प्रभाकर जाधव, दत्ताराम कांबळे, अस्मिता कांबळे, दीपाली जाधव, संतोष कांबळे, राकेश कांबळे, गणपत ताम्हणकर आदी मान्यवर उपस्थित होते.


