आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नाने लांजा बसस्थानकात ३ नवीन एसटी बस दाखल

लांजा : लांजा-राजापूर- साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नातून लांजा बसस्थानकात नव्याने आलेल्या तीन एसटी बसचे लोकार्पण सोहळा नुकताच आमदार किरण सामंत यांच्या हस्ते प्रवासांच्या उपस्थितीत पार पडला.

ग्रामीण भागातल्या प्रवासाची गरज ओळखून गेले अनेक वर्ष जनतेची सेवा करण्यासाठी लांजा बस स्थानकामध्ये एसटी बसची संख्या अपुरी पडत होती. त्याचा फटका ग्रामीण भागातील गावातून येणारा प्रवासांना पडत होता. हा विषय लक्षात घेऊन आमदार किरण सामंत यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून अखेर हा प्रश्न मार्गी लावला आहे. “एसटी बस आणून देतो” हा शब्द न देता तो पूर्णत्वास नेण्याचे काम आमदार किरण सामंत यांनी केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण माजी शिक्षण सभापती विलास चाळके, विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजू कुरूप, आरडीसी बँकेचे संचालक मुन्ना खामकर, शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, भाजपाचे शहर प्रमुख गुरुप्रसाद तेली, लांजाचे नगराध्यक्ष मनोहर बाईत, सचिन डोंगरकर, संजय यादव ,संजय यादव, सुजित आंबेकर, आगार व्यवस्थापक लांजा काव्या रितेश पेडणेकर, विभागीय भांडार अधिकारी रत्नागिरी सौ. भक्ती फुटाणे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक लांजा भाग्यश्री प्रभुणे, कुवेस्कर, स वा निरीक्षक अनिल लांजेकर, साई जुवेकर, श्री. जाधव, तोरणे, कुवेस्कर आदी इतर कर्मचारी उपस्थित होते.



