आरोग्यमुख्य बातमी

रत्नागिरीमध्ये मोफत लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स, दुर्बिणीद्वारे मुतखडा, प्रोस्टेट तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि अथायु हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या वतीने शनिवारी (२० डिसेंबर) सकाळी ११ ते १ या वेळेत मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले आहे.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी आरोग्य शिबिराचे संयोजन केले आहे.

या शिबिरामध्ये लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स, दुर्बिणीद्वारे मुतखडा, प्रोस्टेट व पित्ताशयातील खडे तपासणी व शस्त्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. व्हेरिकोज व्हेन्स हा आजार पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. गर्भधारणा, रजोनिवृत्ती या काळात याचे जास्त प्रमाण असते. पॉवरलूमवर जास्त वेळ उभे राहून काम करणारे कामगार, प्रमाणापेक्षा जास्त वजन असणे, ड्राइवर, कंडक्टर, नाभिक, किराणा दुकानदार, इस्त्री व्यावसायिक यांच्यामध्येही हा जास्त प्रमाणात आढळतो. त्याचप्रमाणे लघवीला अडथळा होणे, लघवीत रक्तस्त्राव होणे, लघवीला घाई होणे, किडनीचे कार्य मंद होणे, मुतखडा, पाठीकडून पोटात दुखणे, थेंब थेंब लघवी होणे, लघवी करताना जळजळ होणे ही मूतखड्याची लक्षणे ही सर्रास दिसतात. प्रोस्टेटमध्ये लघवीची धार कमी होणे, लघवीची धार रोखता न येणे, रात्रीला लघवी वारंवार होणे, लघवी झाल्यानंतरही थेंब थेंब लघवी होणे, लघवी करताना त्रास वाटणे व संपूर्ण झाली नाही असे वाटणे, लघवी बंद होणे, अरुंद मूत्र मार्ग, लघवीतून रक्त जाणे किंवा लघवी लालसर होणे, लघवीला जोर करावा लागणे ही सर्व लक्षणे असणारे रुग्ण या शिबिरामध्ये सहभागी होऊ शकतात.

शिबिरास येताना आपले सर्व जुने रिपोर्ट्स, सोनोग्राफी, पायाचा कलर डॉपलर रिपोर्ट घेऊन येणे. तसचे येताना ओरिजनल रेशन कार्ड व आधार कार्ड घेऊन येणे. नाव नोंदणीसाठी ८९२८७३६९९९ या क्रमांकावर संपर्क करावा. वरील सर्व शस्त्रक्रिया अथायू हॉस्पिटलमध्ये (कोल्हापूर) मोफत केल्या जातील.

या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी घ्यावा, असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मार्फत केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!