मुख्य बातमी

जि‌. प. आदर्श शाळा पूर्णगड नं. १ शाळेत बालिका दिन उपक्रम उत्साहात

रत्नागिरी : तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पूर्णगड नं. मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस “बालिका दिन” म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांनी उत्तम वेशभूषा केली होती. या वेशभूषेत रॅली काढून सावित्रीबाई फुलेंना मानवंदना देण्यात आली. तद्नंतर प्रतिमापूजन, पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केल. तसेच शिक्षकांनीही सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती दिली. “लेक वाचवा लेक शिकवा” या अभियानाची सुरुवात झाली. सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित गीत गायन करून उपक्रमाची सांगता झाली.

उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, सर्व पालक, मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर, विशेष शिक्षिका तृप्ती शिरगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले. उपक्रमाविषयी शिक्षण विस्तार अधिकारी बीट पावस भाग्यश्री हिरवे, केंद्रप्रमुख संजय राणे यांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!