मुख्य बातमी
रत्नागिरीच्या उपनगराध्यक्षपदी समीर तिवरेकर

रत्नागिरी : नगरपालिका निवडणुकीत महायुतीला जोरदार यश मिळाल्यानंतर आज (१२ जानेवारी) उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. या पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) समीर तिवरेकर यांचे नाव यापूर्वीच निश्चित करण्यात आले होते.
तसेच तर ३ स्वीकृत नगरसेवकांचीही आज निवड झाली आहे. यामध्ये शिवसेनेचे अभिजीत दुडये, प्रदीप उर्फ बंड्या साळवी आणि भाजपचे संदीप उर्फ बाबू सुर्वे यांचा समावेश आहे.



