मुख्य बातमी

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रत्नागिरीतून पहिला अर्ज दाखल

ॲड. महेश मांडवकर पावस गटातून रिंगणात

रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज (१७ जानेवारी) दुसऱ्या दिवशी शिवसेनेकडून पालकमंत्री उदय सामंत आणि जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या उपस्थितीत पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला. पावस जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे उमेदवार ॲड. महेश मांडवकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात अधिकृत प्रवेश केला.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीने आपली उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे. त्यानंतर हा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि मांडवकर यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!