मुख्य बातमी

पटवर्धन हायस्कूलच्या १७ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाचे जिल्हास्तरीय विजेतेपद

रत्नागिरी : जवाहर क्रीडांगण, गोगटे कॉलेज, रत्नागिरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात पटवर्धन हायस्कूलच्या मुलींच्या क्रिकेट संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत रत्नागिरी, दापोली, चिपळूण आणि गुहागर येथील १७ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामना पटवर्धन हायस्कूलच्या रत्नागिरी मुलींच्या संघाचा चिपळूण मुलींच्या संघाशी झाला.

अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या मुलींच्या संघाने प्रथम फलंदाजी करत चिपळूणच्या मुलींच्या संघासमोर ४५ धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर रत्नागिरीच्या मुलींच्या संघाने उत्कृष्ट आणि अचूक गोलंदाजी करत चिपळूणच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला. प्रभावी गोलंदाजी व सांघिक खेळाच्या जोरावर पटवर्धन हायस्कूलच्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवत जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले.

या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्याध्यापक श्रीमती घाटविलकर, उपमुख्याध्यापक श्री. पंगेरकर, पर्यवेक्षक श्री. लवंदे आणि प्रशिक्षक श्रीपाद गुरव, श्री. भोये व श्री. साळुंखे तसेच कार्याध्यक्ष श्री. भावे व संस्था पदाधिकारी यांनी मुलींच्या संघाचे अभिनंदन केले. त्यांच्या योग्य मार्गदर्शनासोबतच खेळाडू मुलींची मेहनत, जिद्द, शिस्त आणि सांघिक भावना यामुळे हे यश मिळाले.

पटवर्धन हायस्कूलच्या १७ वर्षांखालील मुलींच्या विजेत्या क्रिकेट संघाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, आगामी स्पर्धांसाठी संघाला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!