नंदकुमार मोहिते यांची २३ मार्च रोजी रत्नागिरीत शोकसभा

रत्नागिरी : कुणबी समाजोन्नती संघाचे कार्यकारिणी सदस्य, ओबीसी बहुजन समाजाच्या विविध प्रश्नांची जाण असलेले समाजसेवक नंदकुमार मोहिते यांचे ६ मार्च रोजी निधन झाले. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीण शाखा रत्नागिरी यांच्या विद्यमाने २३ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता कुणबी भवन जे.के. फाईल रम्यनगर, रत्नागिरी येथे त्यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
गरीब, शेतकरी आणि कष्टकरी समाजाच्या प्रश्नांचे गाढे अभ्यासक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल, श्रमिक विद्यालय व लोकनेते शामरावजी पेजे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय शिवार आंबेरेचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक राजकीय क्षेत्रातील गाढे अभ्यासक व्यक्तिमत्व संघर्ष नेते नंदकुमार मोहिते हे सर्वपरिचित होते. ६ मार्च रोजी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. त्यांची शोकसभा रविवारी (२३ मार्च) रोजी सकाळी १०.३० वाजता कुणबी भवन जे.के. फाईल रम्य नगर रत्नागिरी रत्नागिरी येथे लोकनेते शामरावजी पेजे सभागृहात आयोजित पेलेली आहे.
या शोकसभेत आदरांजली अर्पण करण्यासाठी कुणबी, बहुजन, ओबीसी समाजातील सर्व स्तरातील बंधू-भगिनींनीउपस्थित राहावे, असे आवाहन कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई अध्यक्ष सुर्यकांत गोताड, ग्रामीण शाखा रत्नागिरो अध्यक्ष रामभाउ गराटे यांनी केले आहे.


