रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरीच्या शिमगोत्सवाला २ मार्चपासून प्रारंभ

रत्नागिरी : बारावाड्यांचा मानकरी असलेल्या श्रीदेव भैरी मंदिर देवस्थानतर्फे आयोजित श्रीदेव भैरी शिमगोत्सव सोहळा २ ते ८ मार्च या कालावधीत पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यासंदर्भात नियोजन करण्यासाठी आज भैरी मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात गावकरी, मानकरी, ट्रस्टी, गुरव मंडळी तसेच सर्व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
उत्सवाचे सविस्तर वेळापत्रक असे : २ मार्च रोजी रात्री १० वाजता झाडगाव सहाणेवरून श्रीदेव भैरीला उत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी गावकरी, मानकरी, ट्रस्टी, गुरव मंडळी व ग्रामस्थ पारंपरिक पद्धतीने महालक्ष्मी शेतातून श्रीदेव भैरी मंदिरात रात्री ११ वाजेपर्यंत जातील. मध्यरात्री १२ वाजता श्रीदेव भैरीची पालखी श्रीदेवी जोगेश्वरी मंदिर भेटीसाठी, ग्रामप्रदक्षिणा व जोगेश्वरीची होळी उभी करण्यासाठी मंदिराबाहेर पडेल. खालची आळी, कै. बाळोबा सावंत यांच्या आगरातून महालक्ष्मी शेतातून मध्यरात्रीनंतर १.३० वाजेपर्यंत श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरात आगमन होईल.
३ मार्च रोजी पहाटे ३ वाजता श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून पालखी ग्रामप्रदक्षिणा व होळीचा शेंडा उभा करण्यासाठी बाहेर पडेल. मार्ग असा असेल : झाडगाव सहाणे – झाडगाव नाका – टिळक आळी – कॉग्रेस भूवन – मुर्लीधर मंदिर – बंदर रोड. पहाटे ५ वाजता मांडवी भडंग नाका पुढे मांडवी – घुडेवठार – विलणकरवाडी – चंवडे वठार – खडपे वठार (समुद्रमार्गे) शेट्ये यांच्या घराजवळून खडपेवठार – सकाळी १० वाजता गोडीबाव तळे, तेली आळी – राम नाका – सकाळी ११.३० वाजता राम मंदिर. दुपारी १२ वाजता राधाकृष्ण नाका – गोखले नाका. त्यानंतर गाडी तळ, घसरवाटेने मुरुवाड्यातील २० नं. शाळेमागे श्री शिवलकर यांच्या कंपाऊंडमध्ये होळीचा शेंडा घेण्यात येईल. दुपारी ३ वाजेपर्यंत झाडगाव सहाणेवर होळी उभी केली जाईल.
३ मार्च रोजी रात्री ९ वाजता धुळवड साजरी करण्यासाठी निशाण सहाणेवरून निघेल. मार्ग : सांवतखोत वठार – पटवर्धन यांचे घर देवस्थानचे मुख्य खोत रमाकांत गोपाळ सांवत व श्री संतोष आत्माराम सांवत यांच्या घरी पूजा-अर्चा. श्रीदेवी जोगेश्वरी मंदिर सांवत खोतांची मूळ चौकी – सुर्वे बाग – शिवलकर घराजवळ – कुंभारवाडा – परटवणे फगरवठार, वरची आळी – लक्ष्मी चौक – गोखले नाका – रात्री ११.३० वा. ढमालनिचा पार येथे निशाणाचे तीन भाग होतील. पहिला भाग : गुरव मंडळींसह श्रीदेव भैरी मंदिरात. दुसरा भाग : गोखले नाका – राधाकृष्ण नाका – मासळी बाजार – सुर्वे बोळ – मयेकर घर – झारणी रोड – राम नाका – तेली आळी – रसाळ घर.
तिसरा भाग : पऱ्याची आळी – मारुती आळी – तेली आळी – रसाळ घर. त्यानंतर गोडीबाव नाका – श्री देसाई यांचे घर – खडपेवठार – श्री देसाई व श्री विलणकर शेत – कै. रघू विलणकर घर – राजिवडा येथील श्रीदेव विश्वेश्वर मंदिर (सुमारे १.३० वा.). तेथे गा-हाणे होऊन पुढे राजीवड्यातील चव्हाण घराशेजारी मुस्लीम मानकरी श्री काद्री यांना श्रीफळ देऊन गळाभेट व धुळवड साजरी होईल. त्यानंतर खडपेवठार सती – चंवडे वठार – विलणकरवाडी – श्री दत्त मंदिर नाका – घुडे वठार – मांडवी येथे श्री वारंग यांच्या घरी मुक्काम.
४ मार्च रोजी सकाळी ८ वाजता मांडवी येथून धुळवड : सदानंदवाडी समुद्रमार्गे – पौडा – कुरणवाडी – सिद्धेश्वर विरेश्वर चव्हाटा (गा-हाणे). श्री. आंबुलकर घर – सांब मंदिर – जोतीबा मंदिर येथे दोन भाग होऊन एक भाग राम मंदिर मागील बाजूने आणि दुसरा भाग पुढील बाजूने मिरकरवाडा पोलिस चौकीजवळ एकत्र येईल. त्यानंतर भैरी मंदिर – सुभेदार घर – पिलणकर फिशरीज फॅक्टरी – विठलादेवी – श्री शिरधनकर घर – मुरुगवाडा घसरवाट येथे तेथे दोन भाग होतील. झाडगावकर कंपाऊंड आणि पंधरा माड येथील श्री पिलणकर घर. दुपारी १२ वाजता सांवतखोत यांच्या मूळ चौकीवर धुळवडीची सांगता.
४ ते ७ मार्च या कालावधीत दुपारी १२ वाजेपर्यंत पालखी झाडगाव सहाणेवर दर्शनासाठी स्थानापन्न. दररोज रात्री १० ते १२ वाजेपर्यंत प्रत्येक वाडीतर्फे पारंपरिक पालखी नाचविणे.
७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी झाडगाव – श्रीदेवी जोगेश्वरी मंदिर – खालची आळी – भैरी मंदिर मार्गे – पाटील कंपनी मागील बाजू – मुरुगवाडा – पंधरा माड – रात्रौ १० वा. सहाणेवर आगमन. त्यानंतर पालखी नाचविणे.
८ मार्च रोजी दुपारी १ वाजता पालखी सहाणेवरून रंग खेळण्यासाठी निघेल. पोलिस कर्मचाऱ्यांची शस्त्र सलामी घेत वरचा खोत वठार – श्रीदेवी जोगेश्वरी मंदिर – खेडसकर सांवत कंपाऊंड, झाडगाव नाका – खालचा खोत वठार – दुपारी ३ वा. झाडगाव नाका, सायं. ४ वा. गाडी तळ – ५ वा. श्रीदेवी नवलाई पावणाई मंदिर, शहर पोलीस स्टेशन – धनजी नाका – सायं. ६.३० वा. राधाकृष्ण नाका, ७ वा. राम नाका – राम मंदिर – मारुती आळी – गोखले नाका, रात्री ९ वा. ढमालनिचा पार, विठ्ठल मंदिर – हॉटेल प्रभा – कॉग्रेस भूवन – मुरलीधर मंदिर, रात्री ११.३० वा. श्रीदेव भैरी मंदिर प्रांगणात आगमन. रात्री १२ वाजता पालखी मंदिरात स्थानापन्न होईल. धुपारती व गावाचे गाऱ्हाणे होऊन शिमगा उत्सवाची सांगता होईल, अशी माहिती भैरी देवस्थानचे अध्यक्ष यांनी दिली.



